Welcome to
On Feet Nation
Smith Online
Debra Online
Poddar College Online
jack Online
Posted by seomypassion12 on April 25, 2024 at 2:36am 0 Comments 0 Likes
राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार चंद्रपूर–गडचिरोली-गोंदिया या तीन नक्षलप्रभावित जिल्हयातील सिंचन प्रकल्पांसाठी सन 2019-20 या वर्षासाठी 400 कोटी रूपयांचा स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यासाठी राज्यपालांनी विशेष बाब म्हणून परवानगी दिली आहे.
अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन विभागामार्फत चंद्रपूर–गडचिरोली-गोंदिया या तीन नक्षलप्रभावित क्षेत्रात असलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी 400 कोटी रूपयांचा स्वतंत्र निधी उपलब्ध करण्याची मागणी राज्यपालांकडे केली होती. ही मागणी विशेष बाब म्हणून राज्यपालांनी मान्य केली आहे. यामुळे या तीन जिल्हयातील सिंचन प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील मागासलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्राचे जीवनमान उंचावणा-या चिचडोह या सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.
अधिक माहिती साठी वाचा - महत्वाचे निर्णय - वित्त व नियोजन विभाग
© 2024 Created by PH the vintage. Powered by
You need to be a member of On Feet Nation to add comments!
Join On Feet Nation